द्वितीय वर्धापन दिनाचे अवचित्य साधून मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन..
कर्जत प्रतिनिधी ; कर्जत तालुक्यातील चर्चेत राहिलेली ग्रामपंचायत अशी ओळख असलेले उमरोली ग्रुप ग्रामपंचायत या हद्दिदितील डिकसल येथे अ. पोलिस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया व हिंद. पोलिस फ्रेंड असोसिएशन नवी दिल्ली.
महाराष्ट्र प्रदेश अंतर्गत रायगड जिल्हा युवक अध्यक्ष कु प्रफुल जाधव यांच्या वैशाली सायबर कॅफे च्या द्वितीय वर्धापनदिनानिमित्त डिकसल येथील हनुमान मंदिर मध्ये ज्येष्ठ नागरिक व सर्वसाधारण सर्वांसाठी मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.
शिबिराचे आयोजन हनुमान मंदिरात करण्यात आले यावेळी साधारण ७०/७५ नागरिकांनी सहभाग घेतला या मध्ये डोळे तपासणी, चष्मा , रक्तातील चाचण्या, बिपी, शुगर, कॉलेस्ट्रॉल, वजन, सामान्य चाचण्या ताप, डोकं दुखी, सर्दी खोकला, तसेच औषधे वाटप करण्यात आले.
या वेळी नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला गावातील ज्येष्ठ नागरिक व महिला वर्गानी शिबिरात सहभागी होऊन अपल आरोग्य तपासणी करून घेतली. यावेळी जिल्ह्याचे युवक अध्यक्ष प्रफुल जाधव यांनी मान्यवरांचे स्वागत सन्मान केला. या वेळी डॉ बन्सीलाल पाटील, डॉ विशाल बनसोडे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री काशिनाथ पाटील, संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर साळोखे, प्रदेश कमिटी अध्यक्ष श्री रतन लोंगळे, जिल्हा युवक अध्यक्ष कु प्रफुल जाधव, जिल्हा सदस्य सुभाष ठानगे, हेमंत कोंडीलकर, सामाजिक कार्यकर्ते श्री.शाम पाटील, श्री.पंढरीनाथ ठाकरे, विश्वास गायकर, श्री. सुभाष पाटील,शंकर भाऊ.आदी.उपस्थित होते.



Post a Comment
0 Comments