संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर साळोखे व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री किशोर शितोळे यांच्या हस्ते तालुक्यातील विशेष संघटनेच्या कार्यकर्त्यांचा सन्मान पत्रक व मायेची शाल व गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.
त्यातच संघटनेच्या माध्यमातून समाजात उपक्रम राबविणे, गणपती उत्सव, नवरात्री उत्सव, यांमध्ये पोलिसांसोबत बंदोबस्त मध्ये त्यांना मदत करून नुकतेच बदलापूर ग्रामीण पोलिस यांनी शुभम भोसले यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा सन्मान पत्रक तसेच मायेचा आधार म्हणून ज्याकेट सन्मान करण्यात आला आहे. तसेच पोलिस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया नवी दिल्ली याच्या वतीने त्यांच्या समाज कार्याची दखल घेऊन भोसले त्यांचा सन्मान करून गौरविण्यात आले, या वेळी संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर साळोखे. महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष किशोर शितोळे, प्रदेश कमिटी अध्यक्ष श्री रतन लोंगळे, प्रदेश कमिटी ज्येष्ठ सल्लगर उत्तम ठोंबरे, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष डॉ विशाल बनसोडे, जिल्हा युवक अध्यक्ष प्रफुल जाधव व अन्य मान्यवर उपस्थित होते.
शुभम भोसले यांना पुढील वाटचालसाठी त्यांचं हार्दिक अभिनंदन व शुभेच्या देण्यात आल्या.


Post a Comment
0 Comments