Type Here to Get Search Results !

भिवपुरी रोड रेल्वे स्टेशन कडे जाणारा चिखळमय रस्ता अखेर...


कर्जत प्रतिनिधी.... मुंबई कर्जत या मध्य रेल्वेच्या कर्जत दिशेला असलेल्या भिवपुरी रोड रेल्वे स्थानकात  येणारा रस्ता चिखलमय झाला होता. या रस्त्याची दुरुस्ती उमरोली ग्रामपंचायत आणि रायगड हॉस्पिटल यांच्या कडून करण्यात आली होती.
       भिवपुरी रोड रेल्वे स्टेशन कडे जाणाऱ्या डिकसल गावातून  भिवपुरी रोड रेल्वे स्थानकात जाण्यासाठी असलेला रस्ता चिखलात हरवलेला होता.             
       उमरोली ग्रामपंचायत आणि रायगड हॉस्पिटल  यांनी या रस्त्याची दुरुस्ती केली होती. मात्र जोराचा पाऊस पडल्यानंतर पुन्हा या रस्त्यावर खड्डे पडले, या रस्त्यावर पडलेले खड्डे भरण्यासाठी ग्रामपंचायतीला विनंती करण्यात आली होती, परंतु ग्रामपंचायत ने दुर्लक्ष केल्या नंतर ग्रामपंचायत सदस्या भरती विजय पाटील यांनी पुढाकार घेऊन कर्जत खालापूर विधानसभेचे आमदार मा महेंद्र थोरवे यांच्या वतीने मंगळवारी भिवपुरी रेल्वे स्टेशन रोड कडे  जाणारा रस्ता खडी टाकून व्यवस्थित करण्यात आला आहे.
     या कामासाठी गेल्या तीन महिन्यांपासून चिखलात हरवलेल्या रस्त्यातून नागरिक, प्रवासी व रेल्वे प्रवासी संघटनेचा पाठपुरावा सुरू होता. या वेळी काम सुरू असताना रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष किशोर गायकवाड, रवींद्र राऊत, जय विजय पाटील, रिक्षा स्टँड चे, परेश लोंगळे, अमर गायकर, प्रवीण म्हसे, संदीप गायकर, महेश एनकर, लहू घारे, पंकज म्हसे अदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments