Type Here to Get Search Results !

कर्जत. महिलेवर सामूहिक बलात्कार,, १८ ते १९ वयोगटातील तरुणांना ठोकल्या बेड्या.

कर्जत प्रतिनिधी. ( प्रफुल जाधव) :कर्जत तालुक्यात ठाकूरवाडी येथे खूपच निंदनिय घटना घड ल्याचे समोर आले आहे.
    नुकताच काही दिवसापूर्वी बदलापूर येथील लहान मुलींवर लैंगिक अत्याचार झाले, हे शांत होता न होता कर्जत तालुक्यातील ठाकूरवाडी येथे सर्वांना हादरउन सोडणारी घटना समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार एका निष्पाप महीलेवर घडलेल्या अमानवीय सामूहिक बलात्काराच्या घटनेने तालुक्यात संतापाची लाट पसरली आहे, धक्कादायक प्रकार समोर आला आहे या घटनेत असलेले सात ही आरोपी हे १८ ते १९ वयोगटातील तरुण आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार आरोपी यांनी पीडित महिलेचा मोबाईलवर चित्रण काढले, हे फोटो काढून ते वायरल करू असे तिला धमकावून वारंवार तिच्यावर बलात्कार केला गेला. हीच त्यांची पाशवी वृत्ती पुरेशी नव्हती म्हणून त्यांनी इतर अरोपिनही सामील करून घेत  सात नराधमांनी सामुहिक बलात्कार करून अमानवियतीची हद्द पार केली आहे.
  

  त्याहून अधिकच संतापजनक प्रकार म्हणजे आरोपींनी पिडितीचे छायाचित्र समाज माध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी  देत तिचे जगणे मुश्किल केले होते. अखेर असहाय्य झालेल्या त्या पीडित महिलेने कर्जत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत सातही  आरोपींना  बेड्या ठोकल्या आहेत.
  संपूर्ण परिसरात या घटने बद्दल प्रचंड रोष निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांकडून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी होत आहे. या वेळी कर्जत पोलिस निरीक्षक सुरेंद्र गरड, या प्रकरणात अधिक तपास करीत आहेत, आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्यास सज्ज आहेत. अधिक तपास कर्जत पोलिसांकडून करण्यात येत आहे..

Post a Comment

0 Comments