Type Here to Get Search Results !

अ. पोलिस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया संघटनेच्या कर्जत वॉर्ड अध्यक्ष पदी श्री प्रफुल साळोखे यांची नियुक्ती...



 कर्जत प्रतीनिधी ; कर्जत मध्ये गुडी पाडव्याच्या मुहूर्तावर अनेकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या, अ. पोलिस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया नवी दिल्ली या संघटनेच्या कर्जत व कर्जत अंतर्गत शहर, गाव, या अनेक विभागात पदाधिकारी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. 

        महाराष्ट्र प्रदेश अंतर्गत प्रदेश कार्यालयात यांची नियुक्ती करण्यात आली, यावेळी संघटनेचे उद्दिष्टे यांचं पालन करत, संघटने बद्दल चांगले विचार व पुढे जाऊन चांगलं काम समाज कार्य करून, नागरिकांना व पोलिसांना मदत करून संघटनेचे नाव वाढवण्याचे काम करणार त्याच प्रमाणे संघटनेला कोठेही गालबोट लागू नये यासाठी मी चांगलं काम करून नाव मोठं करेल असे आस्वासन साळोखे व सर्व सहकारी यांनी दिले.

                यावेळी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर सालोखे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेश कार्यालयात उपस्थित महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष किशोर शितोळे, प्रदेश कमिटी अध्यक्ष रतन लोंगले, प्रदेश युवक अध्यक्ष सुप्रेश सालोखे, यांच्या हस्ते श्री प्रफुल साळोखे, गणपत भोईर, शत्रुघन बडेकर, दर्शन खामगाव कर, दिलीप मुंढे, दत्ता ठोंबरे, किशोर मदगे, जगदीश खडे यांना नियुक्ती पत्रक देऊन नियुक्त्या करण्यात आल्या, यावेळी रायगड जिल्हा युवक अध्यक्ष प्रफुल जाधव, कर्जत तालुका युवक अध्यक्ष सुरज चव्हाण, वॉर्ड अध्यक्ष ओंकार घरत, यांच्या वतीने देण्यात आल्या.

Post a Comment

0 Comments