कर्जत; नेरळ; कर्जत तालुक्यातील नेरळ जवळील मीरचोळी गावाच्या हद्दीतील असलेल्या एका फार्म हाऊस मध्ये पर्यावरणासाठी आलेल्या तरुणाचा पेज नदीमध्ये बुडून मृत्यू झाला आहे 21 डिसेंबर रोजी पाण्यात बुडून मृत्यू झाला 22 डिसेंबर सकाळी पोलिसांच्या अथक प्रयत्नाने मृतदेह हाती लागला मुंबई येथील अंधेरी भागातील तरुण आणि काही ज्येष्ठ मंडळी कर्जत कडाव जवळील मिरचोली येथे पर्यटनासाठी आले होते आर्ट डायरेक्टर सुकांत प्राणी ग्राही यांचा मुलगा सौजेस यांच्यासोबत शशांक मोरे भूषण शुभम अन्य सर्व पेज नदी किनारी फोटो काढण्यासाठी गेले असता सव्वीस वर्षे आदित्य मोरे हा नदी पात्रातील दगडावर बसून फोटो काढत होता त्याने फोटो काढण्यासाठी पाण्यात उडी मारली परंतु पाण्यात पोहता येत नसल्याने तो दिसेनासा झाला त्यातच पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने तो वाहून गेला शोध कार्य चालूच होते सकाळी आठ ते सव्वा आठच्या दरम्यान पोलिसांच्या शोध कार्यात काही अंतरावर मृतदेह आढळून आले

Post a Comment
0 Comments