Type Here to Get Search Results !

महाशिवरात्रीच्या दिवशी गोवंश तस्करीची घटना... ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट...

     ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे तस्कर्यांचा कट उधळला, येणं महाशिवरात्रीच्या दिवशी , ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट. सकल नेटवर्क कार्यरत असल्याचा संशय. गोवांशिय तस्करीच्या घटनांमध्ये वाढ, कठोर कारवाई करण्याची आवश्यकता..
   
    कर्जत तालुक्यातील कशेले ग्रामीण भागात गाई बैल तस्करी करण्याचे प्रमाणात दिवसान दिवस वाढ होत आहे.
   आज महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी काही अज्ञातांनी कशेले परिसरातील धोत्रे गावातील गाई व  बैल तस्करी करणाऱ्यांची गाडी अडविण्यात आली आहे. ग्रामस्थांच्या प्रसंगअवधानामुळे गोवंशीय तस्करी रोखण्यास मदत झाली आहे. मात्र पाठलाग दरम्यान रस्त्याचा अंदाज आला नसल्यामुळे वाहन रोड वरील मोरी वरून  अपघात झाल्यामुळे दुर्दैवाने काही गोवांशिय मृत्युमुखी पडल्या आहेत.
      आज पहाटेच्या सुमारास काही अज्ञात तस्करांनी चार गाई एक बैल चोरी करून गाडीत टाकले त्यांना भुल देणारे इंजेक्शन देऊन अगदी सोपे करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र काही जागृत ग्रामस्थांना संशय आल्याने त्यांनी या गाडीचा पाठलाग केला तस्करांनी आपल्या कडील इनोव्हा गाडीचा वेग वाढवून भरधाव वेगाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण रस्त्याचा अंदाज न आल्याने गाडी एका मोरीच्या कठाड्याला धडकून अपघात झाला. यात पळउन नेत असलेले चार गोवंशीय जनावर े मृत्यु मुखी पडली आहे,  यातील दोन आरोपी घटनास्थला वरून फरार झाले . तर एक आरोपी गाडीमध्येच अडकल्याने तो गंभीर जखमी असल्याने त्याला जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 
   दरम्यान कशेले क्षेत्रातील पोलीस हवालदार लालासाहेब थोरवे पोलीस शिपाई राहुल, जाधव हर्ष हंबीर, यांना ग्रामस्थांकडून खबर मिळतात ते घटनास्थळी दाखल झाले. यानंतर गस्तीवर पोलीस उपनिरीक्षक नवले साहेब हे देखील घटनास्थळी दाखल झाले. सदर घटनेचा निषेध करत ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
   अनेक वेळा स्थानिक नागरिक तरुण गोवंश तस्करी करणाऱ्यांच्या गाड्या पकडत असतात तरी काही ठिकाणी आरोपी सहज सुटत असल्यामुळे यामुळे त्यांचं धाडस वाढत आहे. 
    कर्जत तालुका हा सामान्यांना शेतीप्रधान आणि पशुपालनावर अवलंबून असलेला भाग आहे. कर्जत तालुक्यात काही वर्षापासून गोवंशय तस्करीच्या घटनांमध्ये वाढ होत असून यामध्ये सकल नेटवर्क कार्यरत असल्याचा संशय निर्माण होत आहे त्यामुळे अशा प्रवृत्तीस रोखण्यासाठी कडक कारवाई  करण्याची गरज आहे.

Post a Comment

0 Comments