वेनगाव पराडा हद्दीत मानवी संगड्याचे अवशेष. संगड्याचे काही तुकड्यांमध्ये मिळाले अवशेष, फॉरेन्सि चाच्ण्यातूना अधिक माहिती मिळण्याची शक्यता, अधिक तपास कर्जत पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी करत आहेत.
कर्जत तालुक्यातील वेनगाव ग्रामपंचायत हद्दीतील पराडा म्हणून ओळखल्याजानाऱ्या हद्दीतील हा मानवी सांगाडा आढळून आला आहे.
यासंदर्भात माहिती मिळताच कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. एका निर्जन स्थली हे सांगाड्याचे अवशेष दिसून आले असल्याने प्रतेक्ष दर्शी स्थानिकांनी लगेचच पोलिसांना कळवले. हा मानवी सांगाडा काही तुकड्यांमध्ये आढळून आला आहे. त्या मुळे या मृता विषयी संशय व्यक्त केला जातोय.
या मानवी सांगाड्याची ओळख पाठवण्यासाठी सांगाड्यावर काहीही शिल्लक नसल्याने फक्त त्यावर असलेल्या कपड्यावरून आणि विशेष फॉरेन्सि चाचण्यांवरून पोलीस प्रशासन या घटनेचा शोध घेणार आहेत. या मानवी सांगाड्याविषयी अधिक शहानिशा करत कर्जत पोलीस बेपत्ता व्यक्तींची यादी तपासून काही माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. आसपासच्या लोकांकडून काही माहिती मिळाल्यास या घटनेचा शोध लावने शक्य होणार आहे.
हा मानवी सांगाडा एक महिन्यापेक्षा अधिक कालचा असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
कर्जत तालुक्यातील वेनगाव ग्रामपंचायत हद्दीतील हा मानवी सांगाडा मिळाल्यामुळे मोठी खलबल उडाली आहे. आसपासच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पुढील अधिक तपास कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी करत आहेत.



Post a Comment
0 Comments