Type Here to Get Search Results !

समाज कार्यात अग्रेसर, श्री रतन वसंत लोंगळे यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

कर्जत .. कर्जत तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत चींचवली हद्दीतील, गाव बार्डी. येथील रहिवासी अत्यंत मेहनती आणि समाज सेवा करण्याची मानस. समज सेवा करून आपला त्यांनी ठसा उमटविला आहे, अत्यंत हलाखीचे जीवन जगत असताना, त्यांना . पोलिस मित्र संघटनेत काम करण्याची संधी मिळाली, तालुका स्तरावर काम करत असताना त्यांनी अनेक प्रश्न मार्गी लावले, नंतर काही तालुका स्तरावरून जिल्हा स्तरावर त्यांनी आपल नाव कोरल, त्या नंतर त्यांना महाराष्ट्र प्रदेश कमिटी अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले, या मधल्या काळात त्यांना त्यांच्या समाज कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय पुरस्कारने सन्मानित करण्यात आले, स्वभावाने अत्यंत साधे भोळे, तालुक्यात गावात कोणताही समाज कार्य असो हमेशा पुढे असलेले श्री रतन लोंगळे यांची चर्चा, आरोग्य शिबीर, शालेय विद्यार्थी यांना शालेय साहित्य वाटप, स्वच्छ ता अभियान, डोळ्यांचे शिबिर, कीटक नाशक फवारणी, पुर ग्रस्तांना धान्य वाटप,यांसारखे अनेक उपक्रम यांनी संघटनेच्या माध्यमातून केले आहेत. त्यांना दिल्ली येथे 1)राष्ट्रीय प्रतिष्ठा पुरस्कार मिळाला त्या नंतर २)केशव भारत रत्न, ३)राष्ट्रीय प्रतिभा पुरस्कार, ४)समाज रत्न पुरस्कार यांसारखे छोटे मोठे पुरस्कार देखील मिळाले आहेत, श्री रतन लोंगळे यांचं सर्वत्र ठिकाणी कौतुक केले जात आहे. आज संघटनेच्या माध्यमातून संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर साळोखे यांनी मला समाज कार्य करण्यासाठी जी संघटनेत संधी दिली त्या बद्दल त्यांचं ही मी आभार मानतो, त्या प्रमाणे लोंगळे यांनी सर्व नागरिक व प्रसार माध्यमांच हि आभार मानले. व या पुढे देखील अशीच समाज कार्य करीत राहील असे आश्र्वासन दिले...

Post a Comment

0 Comments